Pune Solapur Highway | पुणे-सोलापूर महामार्गावर बर्निंग बसचा थरार..! (Video)

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) कदमवाकवस्ती (Kadamwak Wasti) येथे धावत्या बसने पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना सकाळी नऊ वाजताच्या आसपास घडली आहे. या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार. ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. ही बस कदमवाकवस्ती येथे आली असता गाडीचे टायर फुटले आणि गाडीने अचानक पेट घेतला. आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच लोणी-काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) आणि पुणे महानगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून यावेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.