Paud Pune Crime News | खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणात आरोपीचा सर्वोच्च न्यायालयात जामीन

Pune Crime Court News | Bangladeshi case: Bail granted to 2 more accused living in Pune by making fake documents

पुणे : Paud Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन झालेल्या वादात तिघांनी मिळून महिलेच्या दिराचा खून (Immoral Relationship Murder) करुन त्याचा मृतदेह खड्डा खणून पुरवुन टाकला होता. याप्रकरणात पौड पोलिसांनी (Paud Police Station) तिघांना अटक केली होती. त्यातील एका आरोपीचा तब्बल पावणेचार वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला.

विजयकुमार राठोड (रा. कुळे, ता. मुळशी) असे जामीनावर सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील कुळे गावी १३ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती. संतोष बाळेकाई असे खून झालेल्याचे नाव आहे. संतोष बाळेकाई हा रोज दारु पिऊन येऊन आपल्या वहिनीला तुझे विजयकुमार राठोड याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन वादविवाद करत असे. या त्रासाला कंटाळून उमेश बाळेकाई व अमृता बाळेकाई हिने विजयकुमार राठोड याला बोलावून घेतले होते. घटनेच्या दिवशी विजयकुमार राठोड हा संतोषला समजावून सांगत असताना तो शिवीगाळ करुन लागला. तेव्हा संतोष चा सख्खा भाऊ उमेश बाळेकाई याने घरातील लाकडी दांडक्याने संतोष याच्या डोक्यात मारले. तो खाली पडल्यावर उमेश याने कोयता आणून संतोषच्या मानेवर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर तिघांनी घराजवळ असलेल्या फार्म हाऊसमध्ये खड्डा खोदून त्यात संतोषचा मृतदेह पुरला. पौड पोलिसांनी खून व पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरुन विजयकुमार राठोड, उमेश बाळेकाई व अमृता बाळेकाई यांना २३ नोव्हेबर २०२० रोजी अटक केली होती.

गुन्ह्यात सहभाग दिसत असल्याने विजयकुमार राठोड याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अ‍ॅड. राजेश चंदू वाघमारे यांच्या मार्फत गेल्या वर्षी १५ डिसेबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात विजयकुमार राठोड याचा जामीन अर्ज दाखल केला होता. यावर १५ जुलै २०२४ रोजी सुनावणी झाली. आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेश चंदू वाघमारे (Adv. Rajesh Chandu Waghmare), अ‍ॅड. जयवीर यादव, अ‍ॅड. दिवेशसिंग ,यांनी सर्वोच्च न्यायालयात आरोपी गेली ३ वर्षे ७ महिने येरवडा कारागृहात बंदीवासात असल्याचा युक्तीवाद केला. यामध्ये ॲड. ऋतुजा रमेश मोरे (Adv. Rutuja Ramesh More) यांनी ही सहकार्य केलं. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने विजयकुमार राठोड याचा जामीन अर्ज मंजूर केला.