Pune Crime Court News | शेवाळवाडी- हडपसर येथे सिक्युरिटी एजन्सी चालकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपीस जमीन मंजूर
पुणे : Pune Crime Court News | शेवाळवाडी- हडपसर येथे १७ एप्रिल रोजी खाजगी सिक्युरिटी एजन्सी चालकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी सुधीर शेडगे यास पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे, अरोपी तर्फे ॲड.राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यानी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
फिर्यादी जयवंत खलाटे व आरोपी सुधीर शेडगे हे हडपसर येथील रहिवाशी असून दोघेही माजी सैनिक आहेत तसेच सैन्य दलातून निवृत्त झाल्यांनतर दोघेही आपापली स्वतःची खाजगी सुरक्षा सिक्युरिटी एजन्सी चालवत होते. यांच्यात झालेल्या व्यावसायिक वादातून आरोपीने स्वतःजवळ असलेल्या बंदुकीतून जयवंत खलाटे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागली. यामध्ये जयवंत खलाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. आरोपी सुधीर शेडगे व मुलगा ऋषिकेश यांनी संगनमत करून मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सुधीर शेडगे यांनी स्वतःच्या बदुकीतून गोळ्या झाडल्याच्या आरोपावरून हडपसर पोलीस ठाणे येथे दि. १७ एप्रिल रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपींना दि. १७ एप्रिल रोजी हडपसर पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याच्या तपासावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुराव्याकामी त्या ठिकाणी असल्येल्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज हस्तगत केले. या फुटेजची तपासणी करून घडलेली घटना मा. न्यायालयासमोर सादर केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.राकेश सोनार यांनी मा. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतांना न्यायाल्यास निदर्शनास आणून दिले की आरोपी सुधीर शेडगे याने आपल्या स्वतःच्या परवानाधारी बदुकीतून गोळी मारल्याचा सर्व सीसीटीव्ही मधून दिसून येत आहे, सदर घटनेच्या वेळी फिर्यादी जयवंत खलाटे व सुधीर शेडगे यांच्यात मोठ्या स्वरूपात वाद झाला त्यात फिर्यादी यांच्याकडून सुधीर शेडगे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला, त्यावेळी यांनी स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नातून जयवंत खलाटे यांच्यावर स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडली यात सुधीर शेडगे यांचा फिर्यादी जयवंत खलाटे यांना जीवे मारण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचे सदर सीसीटीव्ही मधून सिद्ध होतं. आरोपी सैन्य दलातील माजी सैनिक असून त्यांना अनेक वर्षांचा शस्त्र हाताळण्याचा व चालविण्याचा चांगला अनुभव आहे. आरोपीचा पिडीत व्यक्तीला जीवे मारण्याचा उद्देश असता तर जवळपास काही फुटांच्या अंतरावरून झाडलेल्या गोळीचा नेम चुकून पिडीताच्या गुडघ्याला गोळी लागली नसती. आरोपीने आपल्या स्वतःकडे असलेल्या बंदुकीतून स्व:संरक्षणासाठी पिडीत व्यक्तीच्या गुडघ्यावर गोळी झाडली आहे. असा युक्तिवाद अॅड. राकेश सोनार यांनी न्यायालयासमोर केला. सदरचा युक्तिवाद गृहीत धरून मा. न्यायालयाने आरोपी सुधीर शेडगे यांना अटी व शर्तीवरती जमीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना उमंग यादव, प्रज्वल पवार, शाक्य सुवी, कुमार खराडे, ऋत्विक जाधव, ॲड. अनिल भानवसे, ॲड. अविनाश खुडे यांनी सहकार्य केले.