ACB Trap On BMC Officer | 2 कोटींची लाच मागून 75 लाख रुपये घेणार्‍या महापालिका अधिकार्‍यांसह तिघे जाळ्यात

ACB Trap News

मुंबई : ACB Trap On BMC Officer | इमारतीवरील दोन अवैध बांधकामावर कारवाई करु नये, यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागून त्यापैकी ७५ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले. महापालिका अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंदार अशोक तारी Mandar Ashok Tari (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महापालिका, अंधेरी पूर्व), मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा Mohammad Shehzada Mohammad Yasin Shah (वय ३३, प्रॉपर्टी इस्टेट एजंट), प्रतिक विजय पिसे Pratik Vijay Pise (वय ३५, कंत्राटदार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Bribe Case BMC)

यातील फिर्यादी यांची मुंबईतील शहीद भगतसिंग कॉलनीमध्ये स्वत:च्या मालकीची चार मजली इमारत आहे. या इमारतीवरील दोन मजले अवैध असून त्यांच्यावर कारवाई न करणे तसेच नियोजित प्लॉट क्रमांक १९३, १९४ खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी सर्व मिळून २ कोटी रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ३१ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. मंदार तारी याने २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ७५ लाख रुपये स्वीकारण्यास मान्य केले. त्याप्रमाणे तात्काळ सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. मंदार तारी यांच्या सांगण्यावरुन मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा व प्रतिक विजय पिसे हे पैसे घेण्यासाठी आले. तक्रारदार यांच्याकडून ७५ लाख रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले. मंदार तारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण (IPS Sandeep Diwan), अपर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे (Rajendra Sangle) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया नटे (PI Supriya Nete) व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले हे तपास करीत आहेत.