Yerawada Pune Crime News | प्रेमसंबंध पुन्हा ठेवले नाही तर जीवाचे बरेवाईट करण्याची तरुणाची धमकी; तरुणीच्या कार्यालयीन सहकार्याला मारहाण

पुणे : Yerawada Pune Crime News | ब्रेकअप नंतर प्रेमसंबंध पुन्हा ठेवले नाही तर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी तरुणाने आपल्या पूर्वश्रमीच्या प्रेयसीच्या कार्यालयात जाऊन दिली. तेथील तिच्या सहकार्याला शिवीगाळ करुन धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्षल सुधीर भोसले (वय २४, रा. सैनिकनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हर्षल भोसले त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्यात ब्रेकअप झाला होता. त्यानंतरही हर्षल हा सातत्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग करुन पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करत होता. तिच्या कार्यालयात येत होता. प्रेमसंबंध पुन्हा सुरु ठेवले नाही तर त्याचे जीवाचे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी तो कार्यालयात येऊन देऊ लागला. तेव्हा फिर्यादीच्या कार्यालयीन सहकारी मदतीला आला. त्याला हर्षल भोसले याने शिवीगाळ करुन धमकावले. या प्रकाराने घाबरुन फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.