Swargate Pune Crime News | स्वारगेट -निगडी बसप्रवासात महिलेची पर्स लांबविली

पुणे : Swargate Pune Crime News | | स्वारगेट ते निगडी दरम्यान पीएमपी बस (PMP Bus) प्रवासात महिलेच्या बॅगेतील सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम असलेली पर्स चोरट्याने नजर चुकवून चोरुन नेली.
याबाबत चिखली येथे राहणार्या एका २६ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता स्वारगेट निगडी या बसस्टॉपवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपरीला जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या स्वारगेट-निगडी या बसस्टॉपवर आल्या. निगडीला जाणार्या बसमध्ये त्या बसल्या होत्या. त्या दरम्यान चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या बर्गमधून पर्स चोरुन नेली. पर्समध्ये ४७ हजार ५७६ रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम होती. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.