Pune Crime News | सोने कारागिराने 2 व्यापार्‍यांना लावला चुना; 42 लाखांचे सोने घेऊन फरार

Fraud

पुणे : Pune Crime News | सोन्याचे दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाख रुपयांचे सोने घेऊन कारागिराने दोघा व्यापार्‍यांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे.

याबाब मयुर प्रविणचंद सोनी (वय ४५, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश शंकर माईती (रा.रविवार पेठ, मुळ पश्चिम बंगाल)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवार पेठेतील श्रीहरी ज्वेलर्स आणि जे एम ज्वेलर्स येथे १७ मार्च ते २३मार्च दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीचे व्यापारी जॉयनाथ पारबोती यांच्या दुकानातील दागिने घडविण्याचे काम रमेश माईती यांच्याकडे दिले जात असे. त्याला दोघांनी मिळून ४२लाख २१ हजार १६८ रुपयांचे २२ कॅरेट वजनाचे ६२० ग्रॅम सोने दिले होते़ त्याचे दागिने घडविण्यास सांगितले होते. त्याने दागिने न घडविता ते सोने घेऊन तो पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.