Manorama Dilip Khedkar | पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर

पुणे : Manorama Dilip Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान दोन दिवसांपासून त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आज (दि.३) पूर्ण झाली आणि कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला
मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.