Intel Lay Off | नोकरीवर संकट! 15000 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कामावरून काढणार ही बहुराष्ट्रीय कंपनी

Lay Off

नवी दिल्ली : Intel Lay Off | बहुराष्ट्रीय कंपनी इंटेल 15 हजार पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कामावरून काढणार आहे. कर्मचार्‍यांना पाठवलेल्या एका मेमोमध्ये कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी एकुण कर्मचार्‍यांची संख्या 15 टक्के कमी करणार आहे.

दुसर्‍या तिमाहीत उत्पन्नात झालेली मोठी घसरण आणि भविष्यात सुद्धा व्यवसाय वेग न घेण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने 2025 मध्ये आपला खर्च दहा बिलियन डॉलर कमी करण्याची योजना आखली आहे. खर्च कपातीसाठी कंपनी आपला वर्कफोर्स कमी करणार आहे.

इंटेल सीईओ पॅट गेलसिंगर यांनी कर्मचार्‍यांना पाठविलेल्या मेमोमध्ये लिहिले आहे की, आमचे उत्पन्न अपेक्षीत प्रमाणात वाढलेले नाही – आणि अम्हाला आतापर्यंत एआय सारख्या शक्तिशाली साधनांचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. आमचे खर्च खुप जास्त आहेत, मार्जिन खुप कमी आहे. या दोन्ही आव्हानांना तोंड देण्यासाठी जास्त धाडसी पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.

द व्हर्जच्या एका रिपोर्टनुसार, इंटेलमध्ये सध्या 125,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. यासाठी 15 टक्के कपात झाली तर 19,000 कर्मचार्‍यांची नोकरी जाऊ शकते.