LPG Price Hike | 1 ऑगस्टपासून महागला एलपीजी सिलेंडर… दिल्लीपासून मुंबईपर्यंत ‘हे’ आहेत नवीन दर

नवी दिल्ली : LPG Price Hike | आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे आणि 1 ऑगस्ट 2024 ला एलपीजी गॅस सिलेंडरला महागाईचा झटका बसला आहे. होय, अर्थसंकल्पानंतर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी वाढ केली आहे. यावेळी सुद्धा 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत यावेळी सुद्धा स्थिर ठेवण्यात आली आहे.
गुरुवारी पहिल्या तारखेपासून कमर्शियल एलपीजी सिलेंडर 8.50 रुपयाने महाग झाला आहे. आता दिल्ली 19 किलोचा एलपीजी सिलेंडर 1646 रुपयांवरून वाढून 1652.50 रुपये झाला आहे. येथे 6.50 रुपये वाढले आहेत. कोलकातामध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 1764.5 रुपये झाली आहे.
मुंबईत या सिलेंडरची किंमत आजपासून 7 रुपयांनी वाढून 1605 रुपये झाली आहे, जी आतापर्यंत 1598 रुपये होती. याशिवाय चेन्नईत सुद्धा एलपीजी सिलेंडरचे दर वाढले असून येथे 1809.50 रुपयांचा कर्मशियल सिलेंडर आता 1817 रुपये झाला आहे.
घरगुती सिलेंडरचे दर स्थिर
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी दिर्घकाळापासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवले आहेत. आज देखील घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये अशी घरगुती सिलेंडरची किंमत स्थिर आहे.