Kondhwa Pune Crime News | नवीन क्रेडिट कार्ड घेणार्या महिलेला बँकेतून बोलत असल्याचे सांगून गंडा; गृहिणीची समय सुचकता, तातडीने तक्रार केल्याने पैसे झाले फ्रीज

पुणे : Kondhwa Pune Crime News | नवीन क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेने पैसे भरण्यासाठी नवीन अॅप सुरु केले आहे. ते अॅप डाऊनलोड करण्यास लावून महिलेला गंडा घालण्यात आला (Online Cheating Fraud Case). आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सायबर क्राईम पोर्टलवर (Cyber Crime Portel) तक्रार केली. त्यामुळे सायबर चोरट्याने (Cyber Thieves) लांबविलेले पैसे पोलिसांनी फ्रीज केले आहे. बँकेतील डाटा हॅक करुन सायबर चोरटे त्यांच्या ग्राहकांची माहिती मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी उंड्री (Undri) येथे राहणार्या एका ३९ वर्षाच्या गृहिणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांचे स्टेट बँकेत खाते असून त्यांनी नुकतेच इंडसइंड बँकेचे क्रेडिक कार्ड घेतले आहे. ३ जुलै रोजी यांना एक फोन आला. त्याने इंडसइंड बँकेतून बोलत आहे, असे सांगितले. तुम्ही आमच्या बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड घेतले असून ते सुरळीत सुरु आहे का? कार्डची लिमीट वाढवून पाहिजे का? कार्ड वापरताना काही अडचणी येत आहेत का? असे विचारु लागला.
तसेच बँकेने क्रेडिट कार्डचे बिल भरण्याकरीता नवीन अॅप सुरु केले आहे असे सांगून त्यांना गुगल क्रोम मधून इंडसइंड सर्व्हिस असे सर्च करुन त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्यावर कार्डची माहिती भरायला सांगितले. त्यांनी क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर लगेच त्यांच्या मोबाईलमध्ये नवीन डिव्हाईस लॉगइन करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत मेसेज प्राप्त झाला. तो मेसेज वाचल्यावर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ६० हजार ९९१ रुपयांचे ट्रान्झेक्शन नो ब्रोकर टेक्नो यांना झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने बँकेत चौकशी केल. तेव्हा त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचे व त्यांनी सायबर क्राईम पोर्टल १९३० ला फोन करुन तक्रार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी फिर्यादी यांचे पैसे इंडियन बँकेत गेल्याचे शोधले. पोलिसांच्या सुचनेनुसार बँकेने हे पैसे फ्रीज केले आहेत. सायबर चोरट्यांनी गंडा घातला असला तरी या गृहिणीच्या समयसुचकतेने त्यांचे गेलेले पैसे वाचले आहेत.