Pune Pimpri Chinchwad Crime News | एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून तरुणीचा खून; महाळूंगे एमआयडीसीतील घटना

Murder In One Sided Love

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) लग्नास नकार दिल्याने चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून तरुणीचा खून (Murder Of Girl) केल्याची घटना महाळूंगे एमआयडीसीतील (Mahalunge MIDC) आंबेठाण येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट (Pimpri Chinchwad Crime Branch) तीन च्या पथकाने आरोपीचा पाठलाग करून सातारा-कराड रोड (Satara Karad Road) येथून अटक केली.

प्राची विजय माने ( वय २१, रा. आंबेठाण, खेड, मूळ- इस्लामपूर, वाळवा ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज रामचंद्र खरात Aviraj Ramachandra Kharat ( रा. बहे. ता. वाळवा ) याला अटक केली आहे. आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड (Sr PI Shailesh Gaikwad) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाइल फोन देखील सोबत घेऊन तो पसार झाला होता.

अविराज हा दुचाकीवरून सातारा-कराड रोडवरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अविराज याचा १५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईल संच, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महाळूंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.