Sinhagad Road Pune Crime News | MSEB पाठोपाठ आता MNGL च्या नावाने केली जात आहे फसवणूक; गॅसचे बिल न भरल्याचा बहाणा करुन फसवणूकीचा पहिला गुन्हा

Cheating Fraud Case

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | तुमचे वीजेचे बिल (MSEB Bill) भरल्याचे दिसत नसल्याचे सांगून अकाऊंट अपडेट करण्याच्या नावाखाली (Light Bill) हजारो लोकांना लुबाडल्यानंतर आता सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एमएनजीएल (MNGL Gas) या घरगुती गॅस कंपनीच्या नावाने लोकांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे (Online Cheating Fraud Case). सिंहगड रोडवरील एका ग्राहकाला तुमचे बिल भरलेले दिसत नाही, असे सांगून त्यांना ३ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हिंगणे खुर्द (Hingne Khurd) येथील एका ५५ वर्षाच्या नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरात एमएनजीएल कंपनीची पाईप लाईन टाकण्यात आली असून त्याद्वारे परिसरात घरगुती कनेक्शन देण्यात आले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन अजिंक्यनगर येथे राहणार्‍या फिर्यादी यांना फोन केला. तुमचे एमएनजीएलचे बिल पेंडिग असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही बिल भरले आहे, असे सांगितले. तेव्हा ते आमच्या सिस्टिममध्ये दिसत नसल्याचे सांगून त्यासाठी एमएनजीएल चे अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादीला एक व्हॉटसअप लिंक पाठवली. ती भरण्यास सांगितली. त्याद्वारे फिर्यादीची सर्व माहिती व डेबिट कार्डसची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून ३ लाख ८३ हजार रुपये काढून फसवणूक केली.

यापूर्वी महावितरण या वीज कंपनीचे बिल भरले नसल्याचे सांगून सायबर चोरटे लोकांना गंडा घालत होते़ त्यानंतर आता एमएनजीएल गॅस कंपनीच्या नावाने सायबर चोरट्यांनी गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. गॅस कंपनीच्या नावाने गंडा घालण्याचा हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. पोलीस निरीक्षक क्षिरसागर अधिक तपास करीत आहेत.