Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका, ”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

मुंबई : Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | या सर्व घोषणा आहेत. मला असे वाटते की प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न होईल. एखाद-दुसरा हप्ता देऊन जनमानस निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. हे तात्पुरते आहे, अशी टीका करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर शंका उपस्थित केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत, अशी चर्चाही नागरिकांमध्ये आहे. महिलांनाही या योजनेबाबत शंका वाटत आहे.
दरम्यान, या योजनेवरून सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले की, ही योजना अर्थसंकल्पात मी जाहीर केली असून चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, हा प्रश्नच उद्भवत नाही. (Maharashtra Assembly Election 2024)
अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना आणल्याचा आरोप होत आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना या योजनेसाठी निधी कुठून आणणार आहे? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.