Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 41 लाखांची फसवणूक

पुणे : Kondhwa Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये भरपूर नफा मिळत (Lure Of Profit In Share Market) असल्याचे वाटल्याने अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) करण्याचा इच्छुक आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांचा ग्रुप (Cyber Thieves Group) अशा इच्छुकांना मोठी आमिष दाखवून त्यांना फसवणूक (Online Cheating Fraud Case) असल्याचे आढळून येत आहे. कोंढव्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Software Engineer) या सायबर चोरट्यांनी शेअर तसेच बिटकॉईन खरेदी करायला लावून तब्बल ४१ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते फेसबुकवर शेअर ट्रेडिंगविषयी माहिती पहात असताना त्यांना एक मेसेज आला. त्यावर त्यांनी क्लिक केल्यावर मयाती गुप्ता या नावाच्या महिलेने त्यांना शेअर ट्रेडिंग विषयी माहिती सांगितली. त्यांना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. अर्जुनसिंग हे ग्रुपचे डीन होते. त्यांनी जास्त नफा देणारे शेअर्स घेण्यास सांगितले. त्यानंतर ग्रुपमधील एकाने क्रिप्टोमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या खात्यावर फिर्यादी हे गुंतवणुकीसाठी पैसे पाठवत राहिले. अशा प्रकारे त्यांनी एकूण ४१ लाख २१ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉल करण्याची रिक्वेस्ट टाकली असता त्यांची रिक्वेस्ट कॅन्सल केली. त्यांच्यातील एक जेम्स स्मिथ याने तुमचे पैसे व्हाईट आहेत की नाही याचे व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यासाठी लागणार्या ब्लॅक फंड व्हेरिफिकेशन करावे लागले. त्यासाठी फिर्यादीने पैसे भरले. पैसे विड्रॉल करण्याची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी आणखी पैशांची मागणी होऊ लागली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.