IMD Weather Forecast | पुणे शहरासाठी पुढील 3 दिवस सतर्कतेचे, हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

Pune Rain

पुणे : IMD Weather Forecast | पुणे शहरासाठी २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मैदानी भागात हलका ते मध्यम तिव्रतेचा पाऊस पडू शकतो. तसेच २८, २९ आणि ३० जुलैसाठी पुण्याला यलो अलर्ट जारी केला आहे. (Pune Rains)

या तीन दिवसांत शहरासह घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Pune Flood)

सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुण्यातही अतिमुसळधार पाऊस पडल्याने दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. काल रात्रीपासून तो बंद करण्यात आला असला तरी या विसर्गामुळे शहराला मोठा फटका बसला. आता पुन्हा पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.