Hadapsar Pune Crime News | फोन पे अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 5 लाख 22 हजारांचा गंडा; गुुगलवरुन बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

पुणे : Hadapsar Pune Crime News | तिरुपती येथे नोकरीवर असताना बंद पडलेले फोन पे अॅक्टिव्हेट करण्यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा नंबर शोधला. दुदैवाने तो सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) टाकलेला नंबर होता. फोन पे अॅक्टिव्हेट (PhonePe) करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी ५ लाख २२ हजार रुपये खात्यातून काढून घेऊन फसवणूक केली. (Online Cheating Fraud Case)
याबाबत एका ५४ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ते तिरुपती येथील नायडूपेठा येथे नोकरी करतात. त्यांचा फोन पे बंद पडल्याने ते अॅक्टिव्हेट करण्यासाठी गुगलवर संपर्क क्रमांक शोधला. त्यात त्यांना आयसीआयसीआयच्या नायडूपेठा ब्रँच मॅनेजरचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावर त्यांनी कॉल केल्यावर समोरील माणसाने आम्ही फोन पे अॅक्टिव्हेट करत नाही. आमचा कस्टमर केअर विभाग आहे. तो तुम्हाला कॉल करेल. थोड्या वेळाने त्यांना व्हॉटसअॅपवर कॉल आला.
त्याने फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेविषयी पूर्ण माहिती घेतली. प्रोसेस केल्यानंतर त्यांनी १० रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. तरीही फोन पे अॅक्टिव्हेट झाले नाही. त्यानंतर त्याने पुन्हा जवळच्या व्यक्तीस पैसे पाठविण्यास सांगितले व थोडा वेळ जाऊ दया, फोन पे अॅक्टिव्हेट होईल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला. अर्ध्या तासाने मोबाईल पाहिला असता त्यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे पाच मेसेज आले होते. त्यांच्या खात्यातून ५ ट्रान्झेक्शनद्वारे ५ लाख २२ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. पोलीस निरीक्षक मोढवे तपास करीत आहेत.