Prabhat Road Pune Crime News | MSEB मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला 12 लाखांचा गंडा; प्रभात रोडवरील महिलेची फसवणूक
पुणे : Prabhat Road Pune Crime News | एमएसईबी मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) त्यांच्या खात्यातील ११ लाख ८१ हजार ९९२ रुपये काढून घेऊन फसवणूक (Online Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पथात रोडवर राहणार्या एका ७६ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ जानेवारी रोजी घडला होता. (Pune Cyber Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरात असताना त्यांना एक फोन आला. फोन करणार्याने आपण एमएसईबी मधून बोलत असल्याचे भासवले. त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठविली. त्यांनी ती डाऊन लोड केली. त्यातून चोरट्याने फिर्यादीच्या मोबाईलचा अॅक्सेस स्वत:कडे घेऊन त्यांच्या खात्यातील ११ लाख ८१ हजार ९९२ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. जानेवारीमध्ये घडलेल्या या घटनेची फिर्याद आता दाखल करण्यात आली असून डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.