Baba Bhide Bridge Pune | भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीस बंद; जाणून घ्या

पुणे : Baba Bhide Bridge Pune | मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूल , जयवंतराव टिळक पूल, होळकर पुलासह शहरातील प्रमुख भुयारी मार्ग वाहतुकीस बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी दिले. मुसळधार पावसामुळे शहरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. (Pune Flood)
शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेल्या भुयारी मार्गात माेठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने गुरुवारी सकाळी भुयारी मार्ग बंद करण्यात आला. महापालिकेचे मलनिस्सारण विभागातील कर्मचाऱ्यांनी तेथील पाण्याचा उपसा केला. दुपारनंतर संचेती चौकातील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करून देण्यात आला.
मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पाऊस झाला. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. भिडे पूल बुधवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद करण्यात आला. महापालिका भवन परिसरातील जयंतराव टिळक पूल गुरुवारी सकाळी वाहतुकीस बंद करण्यात आला.
खडकीतील जुना होळकर पूल, मांजरीतील जुना पूल, मुंबई- पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरातील भुयारी मार्ग, चर्चरोड भुयारी मार्ग, बोपाेडीतील भुयारी मार्ग, तसेच शांतीनगर येथील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. पाणी ओसरल्यानंतर शहरातील भुयारी मार्ग, पूल वाहतुकीस खुले करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पवार यांनी दिली.