Maharashtra Political News | अजित पवारांवर टीका करणं टाळा; आम्हाला त्यांची गरज; भाजप नेत्यांची RSS ला विनंती

Mohan Bhagwat-Ajit Pawar-Devendra Fadnavis

पुणे : Maharashtra Political News | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh – RSS) मुखपत्रातून अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीत सहभागी करून घेतल्यावरून टीका करण्यात आली. महायुतीत अजित पवार नको अशी जाहीर भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान आता आगामी विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार स्वबळावर लढणार का? अशाही चर्चा सुरू झाल्या. मात्र, भाजप नेत्यांनी (BJP Leaders) अजित पवार महायुतीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इतकंच नाही तर, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक विनंती देखील केली आहे. अजित पवारांवर टीका करणे टाळा, असे भाजप नेत्यांनी आरएसएसला सांगितल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे टाळा. अन्यथा महायुतीत फूट पडू शकते, अशी विनवणी देखील भाजप नेत्यांनी आरएसएसला केल्याची माहिती आहे.