Uddhav Thackeray To Shivsena Party Workers | ‘निवडणुकांना अवघे 41 दिवस उरले, कामाला लागा’; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला 5 कलमी कार्यक्रम

uddhav-thackeray

मुंबई : Uddhav Thackeray To Shivsena Party Workers | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना पाच कलमी कार्यक्रम दिल्याची माहिती आहे. निवडणुकांना अवघे ४१ दिवस उरले आहेत. त्यामुळे कामाला लागा, चांगले काम करा. पुढील ४१ दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेवाभवन येथे सादर करायची आहे. विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.

उद्धव ठकरे यांनी दिलेल्या पाच कलमी कार्यक्रमात सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांनी मतदारसंघात दौरा करणे आवश्यक आहे. तसेच सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे. बैठकीसाठी स्थानिक विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख , शाखाप्रमुख, युवासेना शाखा , युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत. विभागात कार्यरत असणाऱ्या जेष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.