Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्टल व चार काडतुसे जप्त

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तीन तरुणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक लाख 41 हजार रुपयांचे तीन पिस्टल व चार काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी (Mahalunge MIDC Police Station) आणि देहुरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) हद्दीत शुक्रवारी करण्यात आली आहे. (Pistols-Cartridges Seized)
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्य़ादीवरुन आदित्य रमेश चांदणे (वय-22 रा. अशोक नगर, ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 200 रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेंगलोर-पुणे हायवे लगत असलेल्या देहुरोड जकात नाक्याजवळील सर्व्हिस रोडवर केली.
दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने कुरुळी गावच्या हद्दीत केली. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत (वय-27) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुशील उर्फ बारक्या भरत गोरे (वय-20 रा. ओटा स्किम, निगडी), अक्षय प्रभाकर कणसे (वय-20 रा. बार्शी रोड, लातुर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे दोन जीवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीतील साईसागर हॉटेलच्या मागे करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.