MLA Ashok Pawar : “आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी” आमदार अशोक पवार यांचा उपक्रम

पुणे : MLA Ashok Pawar | पुणे जिल्ह्याच्या तुळापूर येथे शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी “आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी” या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती, प्रलंबित कामे, प्रकरणे, कर्जमाफी, अतिवृष्टी याद्या इत्यादी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक घेतली,
शिरुर-हवेली, मतदारसंघात तुळापूर, फुलगांव व वढु खुर्द कार्यक्षेत्राअंतर्गत आमदार आपल्या गावी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती, प्रलंबित कामे, प्रकरणे, कर्जमाफी, अतिवृष्टी याद्या इत्यादी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी, मा. आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी गट विकास अधिकारी, पंचायत समिती हवेली, पुणे,तहसिलदार संगायो, हवेली जि पुणे, तालुका कृषि अधिकारी हवेली, तालुका आरोग्य अधिकारी हवेली, उपअभियंता बांधकाम पंचायत समिती हवेली, पशु वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती हवेली, तालुका क्रिडा अधिकारी हवेली, उप अधिक्षक भुमिअभिलेख हवेली,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) हवेली पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, वन परिमंडळ अधिकारी लोणीकाळभोर, उप उभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी व विदयुत महामंडळ लोणीकाळभोर, मंडल अधिकारी लोणीकंद व तलाठी तूळापूर, फुलगांव व वढु खुर्द, पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय हवेली या विभागातील अधिकारी स्वत: हजर राहून शासनाच्या विविध योजनांची आवश्यक माहिती तसेच प्रलंबित कामे दिली आहे , ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक दिवसभर शेतामध्ये तसेत काम करण्यासाठी जात असतात , त्यामुळे त्यांची मोलमजुरी शेतातील कामे आडू नये त्यांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये याचाच विचार करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावामध्ये मुक्कामी जाऊन ग्रामस्थांची नागरिकांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.