Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिस्तूल, गाडीही जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Manorama-Dilip-Khedkar.

पुणे : IAS पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकही केली. दरम्यान पोलिसांनी मनोरमा खेडकरची पिस्तूल आणि चारचाकी गाडी जप्त केली आहे.

पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड येथील एका हाँटेलमधून अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी खेडकरनी वापरलेली पिस्तूल आणि वाहन ताब्यात घेऊन इतर आरोपींनाही अटक करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.

त्याप्रमाणे मनोरमा खेडकरकडील पिस्तूल व लँड कुसर गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सकपाळ (API Sudhir Sapkal), पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव (PSI Yogesh Jadhav) यांच्या पथकाने केली.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता चे कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अँक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल झाला होता . याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.