Pune Crime Branch News | पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime Branch News

पुणे : (सचिन धुमाळ) – Pune Crime Branch News | मोक्का गुन्ह्यात मागील (Abscond In MCOCA) पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने पाठलाग करुन बेड्या ठोकल्या. हि कारवाई गुरुवारी (दि.18) सासवड रोडवरील सोनाई हॉटेल समोर करण्यात आली. ऋषीकेश किसन खोड Rishikesh Kisan Khod (वय २४ रा. पांडवनगर, वडकी ता. हवेली जि, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गुरुवारी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत गस्तीवर असताना गेली पाच महिन्यापासून फरार असलेला मोक्यातील आरोपी हा सासवड रोडवरील (Saswad Road) सोनाई हॉटेल समोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत युनिट सहाचे अंमलदार समीर पिलाने यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सापळा रचला. परंतु पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपीने येथून पळ काढला. मात्र पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या.

आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांसह (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) मोक्काच्या गुन्ह्यात गेली पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने त्याला अटक करण्यात यश आले. पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांच्या पथकाने केली आहे.