Wagholi Pune Crime News | पुणे: पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग, दोघांवर FIR

Molestation

पुणे : Wagholi Pune Crime News | शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे (Molestation Case). हा प्रकार सोमवारी (दि.15) सायंकाळी सहाच्या सुमारास केसनंद फाटा (Kesnand Phata) परिसरातील सोसायटीसमोर घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवृत्ती सावळाराम गाडे (
Nivritti Savalaram Gade) व त्याच्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता कलम 79, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी निवृत्ती गाडे याने महिलेला शिवीगाळ केली होती. त्यामुळे महिलेने वाघोली पोलीस चौकीत तक्रार केली होती.

पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्य़ादी महिला घराबाहेर थांबल्या होत्या. त्यावेळी निवृत्ती गाडे याने महिलेकडे पाहून अश्लील इशारे केले. तर गाडे याच्या पत्नीने महिलेला अश्लील बोलून शिवीगाळ केली. तर निवृत्ती गाडे याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

घरात घुसून महिलेवर अत्याचार

पुणे : माहेरी आलेल्या महिलेसोबत नात्यातील तरुणाने घरात घुसून अश्लील वर्तन करुन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) शुभम सुधीर आंग्रख Shubham Sudhir Angrakh (वय-27 रा.न्युकोपरे, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 22 वर्षीय विवाहितेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 मे रोजी घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.