Sharad Pawar On Chhagan Bhujbal | ‘त्यांची 2-3 भाषणे खूप छान झाली’ – शरद पवार

Sharad-Pawar-_-Chhagan-Bhujbal

पुणे : Sharad Pawar On Chhagan Bhujbal | शरद पवारांवर जाहीर सभेत गंभीर आरोप केल्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जाऊ लागले. आज पुण्यात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य केले आहे.

ते म्हणाले , “हल्ली छगन भुजबळांची दोन तीन भाषणे खूप छान झाली आहेत. परवा ते बीडला गेले होते आणि तिथेही त्यांनी चांगले भाषण केले. त्या दोन्ही भाषणांमध्ये त्यांनी माझ्यावर प्रचंड आस्था दाखवली. ते मला भेटायला आले तेव्हा मला थोडासा ताप होता आणि मी झोपेत होतो. त्यांनी मला काही मुद्दे सांगितले की हे मुद्दे केले पाहिजेत. हे महाराष्ट्राच्या हिताचे आहेत.” (Maratha-OBC Reservation)

ते पुढे म्हणाले, “भुजबळ यांनी दोन-तीन विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील संवाद पाहिला. काही मंत्री ओबीसी आंदोलन (OBC Andolan) सोडवण्यासाठी गेले होते, परंतु त्या दोघांमध्ये काय झाले हे स्पष्ट झाले नाही. भुजबळ यांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत असे सांगितले आहे. परंतु यासाठी शासकांनी समजदार भूमिका घ्यायला हवी” असे पवार म्हणाले.