Bribe Demand For Majhi Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दाखला देण्यासाठी मागितली लाच, लाचखोर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sangli Crime News | Assistant Commissioner arrested while taking bribe of Rs 40 thousand; Sangli ACB takes action

लातूर : Bribe Demand For Majhi Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपये लाच स्वीकारताना प्रयोगशाळा सहायकाला लातूर एसीबीच्या पथकाने (Latur ACB Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर येथील कार्यालयात करण्यात आली. जयप्रकाश बालाजी बिरादार Jayprakash Balaji Biradar (वय 45 रा.विकास नगर, देगलूर रोड, उदगीर ता.उदगीर जि.लातूर) असे लाचखोर प्रयोगशाळा साहायकाचे नाव आहे. (Latur Bribe Case)

याबाबत 24 वर्षीय व्यक्तीने लातूर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन 2012-13 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर मध्ये शिक्षण घेत होती. सन 2013 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता, म्हणून तिचा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबतचा विनंती अर्ज तक्रारदार (विद्यार्थिनीचा सख्खा भाऊ) याने 08 जुलै 2024 रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता.

तक्रारदार यांनी दि.12 जुलै रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता आरोपी बिराजदार यांनी 400 रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली. त्यावरून सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली.

पथकाने मंगळवारी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी बिराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 400 रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर येथील कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे व त्याच्या पथकाने केली.