Ajit Gavhane Join Sharad Pawar NCP | अजित पवारांची साथ सोडत शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 24 पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश (Video)

Ajit Gavhane Join Sharad Pawar NCP

पुणे : Ajit Gavhane Join Sharad Pawar NCP | राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar NCP) यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना एकामागून एक धक्का बसत आहे. अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

चिंचवड (Chinchwad Assembly) आणि भोसरीला (Bhosari Assembly) भाजप आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात अजित पवार गटात मोठी कुजबुज सुरु झालेली आहे. दरम्यान आज अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवारांची तुतारी (Tutari) हातात घेतली आहे. भारतीय जनता पक्षासोबत याठिकाणी काम करण्यास मी इच्छुक नाही, अजित पवार पालकमंत्री असताना देखील शहराचा विकास झालेला नाही, त्याचबरोबर आगामी विधानसभा लढवण्याच्या अनुषंगाने आपण शरद पवार गटासोबत जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे पिंपरी- चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे.

अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे यांची अनुपस्थिति पाहायला मिळाली.

या पदाधिकाऱ्यांनी केला शरद पवार गटात प्रवेश

१. अजित गव्हाणे (शहराध्यक्ष)

२. हणमंतराव भोसले (माजी महापौर)

३. वैशाली घोडेकर (माजी महापौर)

४. पंकज भालेकर (माजी नगरसेवक)

५. प्रवीण भालेकर (माजी नगरसेवक)

६. संगीता ताम्हाणे

७. रवी आप्पा सोनवणे

८. यश माने (माजी नगरसेवक)

९. संजय नेवाळे

१०. वसंत बोराटे (माजी नगरसेवक)

११. वियजा तापकीर (माजी नगरसेवक)

१२. राहुल भोसले (शहर कार्याध्यक्ष)

१३. समीर मासुळकर (माजी नगरसेवक)

यांच्यासह २४ जणांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.