Pune Crime News | पुणे: जास्तीच्या पैशांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी, 8 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असताना पुन्हा पैशांची मागणी करुन दमदाटी केली. तसेच घरात घुसून मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) 8 जणांवर महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 15 जुलै 2024 या कालावधीत भवानी पेठेत घडला आहे. (Money Lenders In Pune)
याबाबत इक्बाल महंमद फरीद शेख (वय-40 रा. राजीव गांधी वसाहत, गुरुनानक नगर, अमीना टॉवर, भवानी पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार झहिर मझिद शेख, फिरोज शेख, मुमताज समशेर शेक, कविता डाडर, अजीज शेख, नाविद शेख (सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) आसमा शेख (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ), समीर शेख (रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 308(3), 308(4) सह महाराष्ट्र सावकारी कायदा कलम 39, 45 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इक्बाल शेख यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी घेतलेले पैसे जास्तीच्या व्याजासह परत केले होते. मात्र, आरोपींनी शेख यांच्याकडे अधिकचे पैसे मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून समाजात बदनामी करु व बाहेरचे गुंड आणून पैसे वसूल करु. तसेच तुला गायब करु अशी धमकी देऊन घरास घुसून मारुन टाकीन, तु मेला तरी तुझ्या बायको व वडिलांकडून पैसे वसुल करून घेईन अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.