Katraj Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

पुणे : Katraj Pune Crime News | अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले (Lure Of Marriage). तिला घरी बोलवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एप्रिल ते मे 2024 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. (Minor Girl Rape Case)
याबाबत पिडीत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी (दि.10) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवराज महेश गायकवाड Shivraj Mahesh Gaikwad (वय-19 रा. गुजरवाडी, कात्रज) याच्यावर आयपीसी 376/2/द, पोक्सो कलम 3, 4, 8 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवले. तिला भेटण्यासाठी घरी बोलवून घेत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी सात आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.