IAS Puja Khedkar | ‘मी सगळ्यांना आतमध्ये घालेन’; पूजा खेडकरच्या आईची पोलिसांना दमदाटी (Video)

Ias Pooja

पुणे : IAS Puja Khedkar | २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Suhas Diwase) यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहीत तक्रार केली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली.

त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. मात्र पूजा खेडकर यांच्या आईने (Manorama Khedkar) पोलिसांना घरात येऊ दिले नाही. बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावलं असून मी सगळ्यांना आतमध्ये घालेन अशी पोलिसांनाच दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पूजा खेडकर ३ जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार मागणी केली. प्रत्यक्षात कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्यादरम्यान त्यांना विविध विभागात काम करावे लागते. या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्या होत्या.