Yerawada Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Tinder App

पुणे : Yerawada Pune Crime News | टिंडर डेटिंग अॅपच्या (Tinder Dating App) माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका घटस्फोटीत महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला (Rape Case Pune). तसेच रिलेशनशिप सुरु न ठेवल्यास महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threats) . याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 3 डिसेंबर 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.4) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निलेशभाई पंजाभाई कलसरीया Nileshbhai Panjabhai Kalsariya (वय-30 रा. फ्लॅट नं.39, कोणार्क कॅम्पस, विमाननगर, पुणे – Viman Nagar Pune ) याच्यावर आयपीसी 376, 376(1), 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा घटस्फोट झाला असून ती 11 वर्षाच्या मुलासोबत वानवडी परिसरात राहते. पीडित महिला एका कंपनीत कामला असून ती वर्क फ्रॉम होम करत आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपी आणि महिलेची ओळख टिंडर डेटिंग अॅपवरुन झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांचे मोबाईल नंबर शेअर केले. चॅटिंग करत असताना एकेदिवशी आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला. त्याने त्याचे नाव अर्जुन असे सांगितले होते. आरोपीने महिलेला लाँग ड्राईव्ह वर जावू असे सांगून मुंबई येथे घेऊन गेला. तिथून परत येताना त्याने महिलेला जबरदस्तीने बिअर पाजली. पुण्यात आल्यानंतर कल्याणीनगर भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.

त्यानंतर आरोपीने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, आरोपीचे इतर मुलींसोबत संबंध असल्याची माहिती महिलेला समजले. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी आरोपीने महिलेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपीने महिलेला फोन करुन तु हे प्रकरण पुढे वाढवले तर मी तुला संपवून टाकेन, तसेच तुझ्या मुलाला देखील कायमचे संपवून टाकेल अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे करीत आहेत.