Retail Inflation | महागाई सोडेना सामान्य जनतेचा पिछा, हिरव्या भाज्यांनंतर डाळींच्या किंमती भडकल्या

0

नवी दिल्ली : Retail Inflation | जून महिन्यात कांदा, हिरव्या भाज्या, बटाटा, टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. यानंतर डाळींच्या किमतीत आलेल्या तेजीने सामान्य जनतेवर डबल अटॅक केला आहे. सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत डाळींच्या किमतीत ११ टक्के वाढ झाली आहे. तूर आणि उडिदचे दर ३ टक्के वाढले आहेत. कांद्याच्या किमतीत सुद्धा ६७ टक्के वाढ झाली आहे. जूनमध्ये सर्वात महाग टोमॅटो झाला आहे, सतत टोमॅटोच्या किमती वाढत आहेत.

राजधानी दिल्लीत भाज्या आणि डाळीच्या किमतीत किती वाढ झाली आहे ते जाणून घेऊया. येथे डाळीच्या किमती सतत वाढ होत आहे. मिनिस्ट्री आणि कंझ्यूमर अफेयरने डाळीच्या किमतीचे आकडे जारी केले आहेत.

या आकड्यांनुसार, ३१ मे रोजी चनाडाळीचा दर ८६.१२ रुपये प्रति किलोग्रॅम होता. आता १९ जूनपर्यंत हा दर २.१३ टक्के वाढीसह ८७.९६ रुपये झाला आहे. तुरडाळीचा दर ३१ मे रोजी १५७.२ रुपये प्रति किलो होता, जो १९ जूनपर्यंत ४.०७ रुपयांनी वाढून १६१.२७ रुपये प्रति किलो झाला. जूनमध्ये मुग डाळीत तेजी दिसून आली. ३१ मे रोजी हा दर ११८.३२ रुपये होता जो १९ जूनपर्यंत ११९.०४ रुपये झाला. उडीद डाळीच्या किमतीत सुद्धा वाढ झाली. ३१ मे रोजी उडीद डाळ १२५.७९ रुपये प्रति किलो होती जी १९ जूनपर्यंत १२६.६९ रुपये प्रति किलो झाली होती. मसूरडाळीत सुद्धा वाढ झाली आहे. १९ जूनपर्यंत तिचा दर ९४.१२ रुपये प्रति किलो आहे, जो ३१ मे रोजी ९३.९ रुपये प्रति किलो होता.

बटाटा दरात प्रचंड वाढ
या महिन्यात बटाट्याच्या दरात जवळपास ८ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ३१ मे रोजी बटाटा २९.८२ रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. जूनमध्ये तो वाढून ३२.२३ रुपये प्रति किलो झाला. सध्या राजधानी दिल्लीत बटाट्याचा दर ३० रुपये प्रति किलो आहे.

वाढले कांद्याचे दर
राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात ६७ टक्के वाढ झाली आहे. तर देशाच्या इतर राज्यात यामध्ये सुमारे १८ टक्के वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकड्यानुसार, ३१ मे रोजी कांद्याचा दर ३० रुपये प्रति किलो होता, जो १९ जूनपर्यत ५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. देशात सरासरी त्याचा दर ३७.८३ रुपये प्रति किलो आहे.

महागले टोमॅटो
कांदा, बटाट्यानंतर टोमॅटोच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. सर्वात जास्त दर टोमॅटोचे वाढले आहेत. ३१ मे रोजी चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोचा दर ३४.१५ रुपये प्रति किलो होता जो जूनमध्ये ४४.९ रुपये प्रति किलो झाला. दिल्लीत त्याचा दर २८ रुपयांवरून वाढून ३३ रुपये प्रति किलो झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.