IRDAI New Rule | ULIP बाबत IRDAI ने जारी केले ‘हे’ नियम, आता विमा कंपनी करू शकणार नाही ‘हे’ काम

नवी दिल्ली : IRDAI New Rule | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आज विमा कंपन्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार आता विमा कंपनी युनिक लिंक्ड इन्श्युरंस प्लान (ULIPs) आता गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणून समाविष्ट करू शकत नाही (IRDAI on ULIP).

इरडाने याबाबत मास्टर सर्क्युलर जारी केले आहे. यामध्ये स्पष्ट केले आहे की, विमा कंपनीने जाहिरातीमध्ये युलिपला गुंतवणुकीसारखे दर्शवू नये. (Ulip Should Not Be Advertised)

इन्श्युरंस रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने युलिप जाहिरातींबाबत सर्क्युलरमध्ये विमा कंपन्यांसाठी गाईडलाइन जारी केली आहे. इरडाने म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी या नियमांचे आवश्य पालन करावे.

इरडाच्या सर्क्युलरनुसार आता इन्श्युरंस कंपनी युनिट लिंक्ड अथवा इंडेक्स लिंक्ड प्रॉडक्टला गुंतवणुकीचे उत्पादन म्हणून दाखवू शकत नाही. जर कंपन्यांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

काय आहे नवीन नियम

  • इरडाने आपल्या गाईड लाइन्समध्ये म्हटले आहे की, विमा कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये अनेक गोष्टींचा वापर अजिबात करू नये. कंपनीची कोणतीही सेवा ज्याचा संबंध विम्याशी नाही, त्याचा वापर जाहिरातीमध्ये करू शकत नाही.
  • जाहिरातीत इन्श्युरंस कंपनी जुने व्याजदर अथवा डिस्काऊंटशी कंपेयर करू शकत नाही.
  • याशिवाय कंपनी आता इन्श्युरंसचे फायदे हायलाईट करू शकत नाही.
  • इरडाने म्हटले आहे की, कंपनीने आंशिक फायद्यांची माहिती देताना त्याची मर्यादा आणि अटींची माहिती द्यावी.
  • कंपनी आता आपल्या प्रॉडक्टवे फायदे वाढवून-चढवून सांगू शकत नाही.
  • आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीबाबत कोणतीही इन्श्युरंस कंपनी अयोग्य गोष्टी सांगू शकत नाही.

युलिपबाबत काय आहे नियम
इरडाने गाईडलाइन्समध्ये म्हटले आहे की, इन्श्युरंस कंपनीने आता आपल्या जाहिरातीमध्ये युनिट लिंक्ड इन्श्युरंस प्रॉडक्ट, इंडेक्स लिंक्ड प्रॉडक्ट अथवा एन्युटी प्रॉडक्टच्या व्हेरिएबल एन्युटी पे-आउट ऑपशनबाबत सोप्या भाषेत माहिती द्यावी.

याशिवाय कंपनीने इन्श्युरंसमध्ये मिळत असलेल्या रिटर्नमध्ये होणारा चढ-उतार याबाबत सुद्धा माहिती द्यावी. कंपनीच्या जाहिरातीमध्ये जुन्या डेटाचा वापर करू नये.

जर जाहिरातीमध्ये कंपनीने अशाप्रकारच्या डेटाचा वापर केला तर त्यांना अशा डेटासाठी वेगळा फॉन्ट आणि साईजचा वापर करावा लागेल. कंपनीला आपल्या जाहिरातीमध्ये करस्पॉन्डंट इंडेक्सबाबत सुद्धा सांगावे लागेल.