Sharad Pawar – Maharashtra Assembly Elections 2024 | राज्य सरकार कसं हातात येत नाही, मी बघतोच; शरद पवारांचा निर्धार

बारामती : Sharad Pawar – Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Results 2024) निकालात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागात भेटीगाठी दौरा सुरु केलेला आहे. दरम्यान शरद पवार तीन दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. येथील ग्रामीण भागात जाऊन दुष्काळग्रस्त नागरिकांच्या व्यथा ते समजावून घेत आहेत. (Sharad Pawar Baramati Tour)

बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील नागरिकांच्या दुष्काळी प्रश्नांसंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्रही लिहिले आहे. बुधवारी त्यांची बारामतीच्या नीरावागजमध्ये छोटेखानी जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारामतीच्या ग्रामीण भागांतील जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. नीरावागज येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला. दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच शेतीसमोरील आव्हाने असे विविध मुद्दे नागरिकांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवले.

त्यानंतर केलेल्या संबोधनात पवार म्हणाले, “आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण कालच्या (लोकसभा) निवडणुकीत जसे आपण केले तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही, तेच मी पाहतो. एकदा का राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही” असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.