Sachin Tendulkar चा फेव्हरेट शेयर बनला रॉकेट, 5 कोटींची गुंतवणूक बनली 72 कोटी!

0

नवी दिल्ली : Sachin Tendulkar | टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकरने त्याची फेव्हरेट कंपनी आझाद इंजिनियरिंग लिमिटेड (Azad Engineering Ltd) कोट्यवधी रुपये लावला आहेत आणि यातून त्याला जोरदार नफा झाला आहे. बुधवारी उलथा-पालथ होत असलेल्या बाजारात देखील या कंपनीच्या शेयरमध्ये अपर सर्किट लागले आणि तो ऑल टाइम हायवर पोहोचला. (Stock Market)

शेयर आहे की पैसे छापण्याचे मशीन!

आजाद इंजिनियरिंग एक स्मॉलकॅप कंपनी असून तिच्या शेयरमध्ये अचानक तेजी सुरू झाली आहे. बुधवार स्टॉक मार्केटमध्ये कधी उसळी कधी घसरण सुरू होती. परंतु आझाद इंजिनियरिंग शेयर उसळीसह जोरदार ट्रेड करत होता.

या कंपनीच्या शेयरमध्ये मार्केट ओपन होताच ५ टक्केचे अपर सर्किट लागले आणि तो १९८१.८० रुपयांच्या स्तरावर पोहोचला, जी त्याची ऑल टाइम हाय लेव्हल आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या शेयरमध्ये लागोपाठ तिन दिवस अपर सर्किट लागले.

गुंतवणूकदारांना मिळाला मल्टी बॅगर रिटर्न

आझाद इंजिनियरिंग लिमिटेडच्या शेयरमध्ये सुरू असलेल्या तेजीमुळे गुंतवणुकदारांना जबरदस्त लाभ होत आहे. मागील पाच दिवसात हा शेयर १४ टक्के वाढला आहे, तर एक महिन्यात त्याच्या किमतीत २८ टक्के वाढ झाली आहे. एक महिन्यात त्याने गुंतवणूकदारांचे पैसे तीन पट वाढवले. या कालावधीत गुंतवणुकदारांना १९२.५२% चा मल्टीबॅगर रिटर्न मिळाला. तेजीमुळे मार्केट कॅपिटलायजेशन वाढून ११७२० कोटी झाले आहे.

सचिन तेंडूलकरने या शेयरमध्ये मार्च २०२३ मध्ये ५ कोटी गुंतवले होते. त्याला कंपनीचे ३,६५,१७६ इक्विटी शेयर मिळाले होते. त्यावेळी या शेयरची किमत १३६.९२ रुपये प्रति शेयर होती. या हिशोबाने पाहिले तर आतापर्यंत त्याच्या गुंतवणुकीत १४.५६ पट वाढ झाली आहे आणि ५ कोटी रुपये वाढून ७२.३७ कोटी रुपये झाले आहेत.

या शेयरमध्ये तेंडूलकरसह माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी सुद्धा पैसे लावले आहेत. १९८३ मध्ये स्थापन झालेली आझाद इंजिनियरिंग लिमिटेड एयरोस्पेस कंपोनंट्स आणि टरबाइन मॅन्युफॅक्चरिंग करते. कंपनी एयरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि तेल, गॅस उद्योगसत मुळ उपकरण निर्मात्यांना आपले प्रॉडक्ट देते.

Leave A Reply

Your email address will not be published.