Chhagan Bhujbal – Sharad Pawar | छगन भुजबळांच्या परतीचे संकेत आहेत का?; शरद पवार म्हणाले – ‘माझी आणि त्यांची भेट…’

0

पुणे: Chhagan Bhujbal – Sharad Pawar | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ajit Pawar NCP) असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. ते वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. वांद्रे इथं झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना भूमिका घेण्याचा आग्रह केला आहे. तेव्हापासून ते इतर पक्षात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरु आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेपाठोपाठ (Lok Sabha Election 2024) राज्यसभेवरुन (Rajya Sabha) नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा यावरुन मंत्री छगन भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरु आहेत. भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा समता परिषदेतून सूर निघाल्याची चर्चा आहे.

महायुतीतून (Mahayuti) भुजबळ बाहेर पडणार की मग दबावतंत्र सुरु आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या दरम्यान पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. छगन भुजबळांनी म्हंटलं की मी राष्ट्रवादी बरोबर आहे , दादांबरोबर नाही. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? भुजबळ यांच्या परतीचे संकेत दिसत आहेत का?

यावर बोलताना शरद पवार म्हणाले,” त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी मला काही माहिती नाही. माझी आणि त्यांच्या मागच्या सहा महिने वर्ष भरापासून भेट झालेली नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही” असे शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.