Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: दोन टोळक्यामध्ये राडा, परस्परविरोधी गुन्हे; 5 जणांना अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणाच्या कारणावरुन दोन टोळक्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे. ही घटना नेहरूनगर परिसरातील झिरो बॉईज चौकात (Zero Boys Chowk Nehru Nagar) रविवारी (दि.16) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. (Rada Between Two Groups)

विनायक हनुमंत गायकवाड (वय-19 रा. नेहरुनगर, पिंपरी) याने दिलेल्या तक्रारीवरुन अक्षय संजय ठोके (वय-23) अजय संजय ठोके (वय-25 दोघे रा. विठ्ठलनग, पिंपरी) यांच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506, 34 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. फिर्यादी विनायक गायकवाड त्याचा मावस भाऊ अक्षय गायकवाड व त्याचा मित्र अनिकेत वाळके यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपी अक्षय याने त्याला मारहाण केली. तसेच आरोपींनी आरडा ओरडा करुन लोकांना शिवीगाळ करुन आम्ही या एरियाचे भाई आहोत कोणी आमच्या भांडणात पडले तर बघुन घेऊ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.

तर अजय संजय ठोके याने दिलेल्या तक्रारीवरुन विनायक हनुमंत गायकवाड, अक्षय बाळु गायकवाड (वय-26), अनिकेत सुरेश वाळके (वय-23 रा. नेहरुनगर पिंपरी ) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. फिर्यादी अजय आणि आरोपी अक्षय हे नेहरुनगर येथे थांबले होते. त्यावेळी अक्षय याने अनिकेतला फोन करुन बोलवून घेतले. अक्षय आणि अनिकेत यांच्या वाद सुरु झाल्यानंतर अजय याने त्याचा भाऊ अक्षय ठोके याला बोलवून घेतले. अक्षयला आपल्याला मारण्यासाठी बोलवून घेतल्याचा गैरसमज करुन विनायक याने अजयला मारहाण केली. तर अक्षय याला शिवीगाळ करुन गट्टु डोक्यात मारुन जखमी केले. तसेच परिसरात दहशत पसरवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.