Pune Crime News | पुणे: PMO कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून 50 लाखांची फसवणूक; कौन्सिल हॉल परिसरातील घटना

0

पुणे : – Pune Crime News | पंतप्रधान कार्य़ालयात राष्ट्रीय सल्लागार (National Advisor In PMO) असल्याचे भासवून शासकीय टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Getting Government Tenders) एका व्यक्तीची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार पुण्यातील कौन्सिल हॉल (Council Hall Pune) परिसरात आणि चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) टोनी का ढाबा (Toni Da Dhaba Pune) याठिकाणी डिसेंबर 2019 ते मार्च 2022 या कालावधीत घडला आहे.

काश्मीरा संदीप पवार Kashmir Sandeep Pawar (वय 29 रा. प्लॉट नंबर 14, कोयना सोसायटी, सदर बाजार, सातारा) आणि गणेश गायकवाड (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर गोरख जगन्नाथ मरळ (वय 49, रा. सहकारनगर, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) याप्रकरणी आयपीसी 419, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची ओळख झाल्यानंतर आरोपी कश्मिरा पवार हिने फिर्यादी यांना स्वत: पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगितले. तसेच शासकीय टेंडर मिळवून देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. फिर्यादी यांना विश्वास व्हावा यासाठी त्यांना पुण्यातील विधान भवनात भेटण्यासाठी बोलावलून घेतले. तसेच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर शासकीय टेंडरचे बनावट कागदपत्रे पाठवली.

टेंडर मिळाल्यानंतर पैसे कमवता येतील या भावनेतून फिर्यादी यांनी कश्मिरा हिच्यावर विश्वास ठेवला. टेंडर मिळवायचे असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून रोख आणि आरटीजीएस द्वारे 50 लाख रुपये घेतले. मात्र, पैसे दिल्यानंतर देखील टेंडर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्य़ादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.