Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीला सोडून पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश?; भुजबळ म्हणाले – ‘विधानसभेआधी अथवा नंतर मी…’

0

पुणे“: Chhagan Bhujbal | मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला आक्षेप म्हणून ओबीसी समाजही (OBC Samaj) रस्त्यावर उतरलेला आहे. मुंबईत पार पडलेल्या समता परिषदेच्या (Samata Parishad Meeting) बैठकीत जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण आंदोलन करू असे भुजबळांनी सांगितले होते. तसेच बैठकीत भुजबळांनी या प्रश्नाला घेऊन प्रसंगी राजीनामा द्यावा असाही सूर उमटला होता.

आधीच लोकसभेचे (Lok Sabha Election) तिकीट न दिल्याने तसेच राज्यसभेवर (Rajya Sabha) न पाठवल्याने भुजबळ नाराज असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला (Ajit Pawar NCP) सोडून पुन्हा शिवसेना ठाकरे गटात (Shivsena UBT) प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या सर्व चर्चांवर भुजबळांनी माध्यमांशी बोलताना उत्तरे दिली आहेत. या सर्व अफवा असून मी अजित दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे असे म्हंटले आहे. ” विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायम राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहीन. तसेच मी नाराज आहे दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली, या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मला कोणाला भेटायचे असेल तर मी उघडपणे भेटेन, असे भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, “माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) नाराज असतील, मोदीसाहेबही (PM Narendra Modi) नाराज असतील. शरद पवारही (Sharad Pawar) नाराज असतील, देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) नाराज असतील, अजित पवारही बारामतीची (Baramati Lok Sabha) जागा का गेली यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामाला लागलो आहे. मी नाराज नाही किंवा कुणालाही भेटलो नाही”, असेही छगन भुजबळ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.