Pune Rural Police | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 71 म्हशींचे प्राण वाचवून 60 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : – Pune Rural Police | बकरी ईद सणाच्या (Bakra Eid 2024) अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. ओतूर पोलिसांनी (Otur Police) 71 म्हशींचे प्राण वाचवून पाच ट्रकसह एकूण 60 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सात आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.
मोहम्मद वकील इकरार खान (वय 64 रा. अमरपूर, ता. सियाना, जि. बुलंदशहर उत्तर प्रदेश), तोहित वाहिद कुरेशी (वय 45 रा. शिवाजीनगर मुंबई), उस्मानखान रमजानखान (वय 60 रा. गोवंडी, मुंबई), रशीद अब्दुल रहीम शेख (वय 32 रा. गोवंडी, मुंबई), फिरोज सोहराब मलिक (वय 43 रा. ब्रहानाभुगरासी, ता. सियाना, जि. बुलंदशहर), फारूक कुरेशी (रा. फलटण सातारा) व मोहम्मद बिलाल भाईमिया शेख (रा. शिवाजीनगर कुर्ला मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर, पाच ट्रकसह 71 जीवंत व दोन मृत म्हैस ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुबी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान पाच ट्रकच्या पाठीमागील हौदात लहान-मोठ्या अशा एकूण 73 म्हैस जनावरे त्यांना वेदना होईल अशा परिस्थितीत दाटीवाटीने चारा-पाण्याची सोय न करता, सस्सीच्या सहाय्याने जखडून बांधून जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नसताना, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना बकरी ईदच्या अनुषंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विकण्यासाठी वाहतूक करताना मिळून आले.
73 म्हशींपैकी 71 म्हशी जीवंत तर 2 मृत अवस्थेत आढळून आल्या. ताब्यात घेण्यात आलेली जनावरे देखभालीसाठी जिवदया मंडळ गोशाळा संमनेर, जि. नागर येथे जमा करण्यात आले आहे. या कारवाईत पाच ट्रक आणि 71 म्हैस जनावरे असा एकूण 60 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात आरोपींना प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमाखाली अटक केली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अनिल केरूरकर, सहायक फौजदार महेशकुमार झणकर, पोलीस हवालदार ए.के.भवारी, धनंजय पालवे, महेश पटारे, भारती भवारी, दिनेश साबळे, शंकर कोबल, सुरेश गैंगजे, बाळशीराम भवारी, नामदेव बांबळे, विलास कोंढावळे, नदीम तडवी, संदीप लांडे, भरत सूर्यवंशी, ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, शामसुंदर जायभाये, विश्वास केदार, रोहित बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे, आशीष जगताप, विशाल गोडसे, अंबादास काळे, राजेंद्र बनकर, सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांच्या पथकाने केली आहे.