Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | “धडा घेणं गरजेचं “, सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

मुंबई: Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीला सांगलीची (Sangli Lok Sabha) जागा उद्धव ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमधील काही नेते नाराज होते. त्यांनी ही जागा शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) दिल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी तर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच वंचितने पण एक डाव धोबीपछाड टाकला. त्यांनी प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढला आणि तो विशाल पाटील यांना जाहीर केला. त्यामुळे सांगलीच्या लढतीत आणखी रंगत आली.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले तर शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचा पराभव झाला. दरम्यान या जागेवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस पाहायला मिळाली. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या मतदारसंघामधून काँग्रेसही उमेदवार देण्यास इच्छुक होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली.
त्यानंतर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, “जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरूद्ध तिकीट देता कामा नये, हा धडा घेणं गरजेचं आहे”, असा टोला नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.