Rupali Thombare Patil On Sushma Andhare | अंधारे यांच्याकडून ठाकरे गटात येण्याची साद; “रुपाली ठोंबरे म्हणाल्या, चांगली संधी..”

0

पुणे : Rupali Thombare Patil On Sushma Andhare | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे रुपाली ठोंबरे यांना अजित पवार गट (Ajit Pawar NCP) सोडून ठाकरे गटात येण्याची साद घातली होती.

यामध्ये अंधारे यांनी म्हटलं आहे की “निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरिही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…” अशी सूचक पोस्ट अंधारे यांनी केली होती.

यावर आता सुषमा अंधारे यांच्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “राजकारणात सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण आहेत. मात्र त्यांनी ऑफर दिली असली तरी मी अजित पवार यांच्यासोबत काम करणार आहे. सुषमा अंधारे यांनी अशा प्रकारची ऑफर देणे हे राजकारणातील महिलांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. त्यामुळे स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल.

सुषमा अंधारे यांनी त्यांना राष्ट्रवादीविषयी ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल आभारी आहे. येणाऱ्या काळात अजित पवारांसोबत काम करणार आहे. माझी मुस्कटदाबी होत असेल तर समोर येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी मिळेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर सध्यातरी स्वीकारली नाही”, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.