Shankar Jagtap – Ashwini Jagtap | चिंचवड विधानसभेवरून शंकर जगताप आणि अश्विनी लक्ष्मण जगताप आमने-सामने; दोघांनी चिंचवडवर केला दावा

0

चिंचवड : Shankar Jagtap – Ashwini Jagtap | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) अनुषंगाने उमेदवारीबाबत घरातच वादंग असल्याचे समोर येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून (Chinchwad Assembly) अश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे घरातच सुप्त वाद सुरु असल्याचे दिसत आहे.

चिंचवड विधानसभेवरून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चढाओढ लागली आहे. शंकर जगताप हे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दिर आहेत. शंकर जगताप यांनी उघडपणे चिंचवड विधानसभेवर दावा करत इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर देत चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या त्या राजकीय उत्तराधिकारी असल्याचं देखील अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी अधोरेखित केले आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, चिंचवड विधानसभेवर भाजपची ताकद आहे. महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटते. दिवंगत लक्ष्मण जगताप हे चार वेळेस चिंचवड विधानसभेतून निवडून आलेले आहेत. तिथं आमची ताकद जास्त आहे.

दिर, शंकर जगताप यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. बोलण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. विधानसभा लढवण्यावर मी ठाम आहे. पोटनिवडणुकीच्या वेळी कुठलीही चर्चा झाली नाही.

उलट, परिवारातील प्रत्येकाने पोटनिवडणुकीत झोकून देऊन ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले. लोकसभेपूर्वीच माझी विधानसभेची तयारी सुरू असून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.