IT Sector Freshers | जॉब प्लेसमेंट तर झाले, परंतु ऑफिसमध्ये ज्वायनिंगचा नाही पत्ता, IT सेक्टरचे फ्रेशर्स त्रस्त, कर्मचाऱ्यांच्या संख्येत 63,759 ने घट

0

नवी दिल्ली : IT Sector Freshers | भारतात आयटी सेक्टर सर्वात जास्त नोकरी देणारे सेक्टर म्हणून ओळखले जाते, परंतु फ्रेशर्ससाठी काही काळापासून ऑनबोर्डिंगमध्ये उशीर होण्याची समस्या निर्माण झाली आहे. म्हणजेच फ्रेशर्सला कॅम्पस प्लेसमेंट अथवा इतर पद्धतीने हायर तर करण्यात आले होते, पण अजूनपर्यंत त्यांचे ज्वायनिंग झालेले नाही. काही प्रकरणात तर ही तक्रार दोन वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्याबाबत देखील आहे.

इंग्रजी न्यूज पोर्टल टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मागील दोन वर्षात भारतात किमन १०,००० फ्रेशर्सला नोकरीची ऑफर दिली गेली होती, परंतु त्यांना अजुनपर्यंत आयटी कंपन्यांनी कार्यालयामध्ये वर्कफोर्समध्ये सामावून घेतलेले नाही. यासाठी आयटी कर्मचारी संघ नेसेंट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉईज सीनेट (एनआयटीईएस) च्या आकड्यांचा संदर्भ देण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, आयटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष हरप्रीत सिंह सलूजा यांनी म्हटले की, ज्या उमेदवारांना टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, जेन्सर आणि एलटीआयमाइंडट्रीसह कंपन्यांमध्ये पोझीशन ऑफर झाली होती, परंतु अजूनपर्यंत ज्वायनिंग झालेले नाही. त्यांनी लेबर यूनियनला ऑनबोर्डिंगला होत असलेल्या विलंबाबत तक्रार केली आहे. या तक्रारींमध्ये टॉप लेव्हल आणि मिड लेव्हल दोन्ही आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नॉर्थ अमेरिका आणि यूरोपमध्ये असलेली व्यवसायिक अनिश्चितता हे कारण या विलंबासाठी सांगण्यात येत आहे. येथे आर्थिक मंदीच्या संकेतांनी कस्टमर्सला आयटी खर्चांबाबत अलर्ट केले होते, त्याचा परिणाम नवीन हायरिंगवर सुद्धा दिसत आहे.

तीन प्रमुख आयटी कंपन्यांच्या कर्मचारी संख्येत घट टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या प्रमुख कंपन्यांनी अलिकडेच आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी आपल्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या निकालांची घोषणा केली. या सर्वांनी संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आपल्या एकुण कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट नोंदवली आहे. एकुण तीन मेजर सॉफ्टवेयर सेवा एक्सपोटर्सने पूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संख्येत ६३,७५९ ची घसरण नोंदवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.