Ajit Pawar NCP On RSS | “आम्हालाही लिहिता येतं, रोष कोणावर आहे हे जरा …”; आरएसएस च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

0

पुणे: Ajit Pawar NCP On RSS | अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायजरमधून झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे.

रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता म्हटले की, ” भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षडयंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले.

भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही. महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.”

या टीकेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे. एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असा इशारा दिला आहे.

“भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादा मुळे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या.. लिहता आणि बोलता आम्हाला पण येते लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका,” अशी पोस्ट सूरज चव्हाण यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.