Bajrang Sonawane-Ajit Pawar | बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा अजित पवारांना फोन; ट्विटने खळबळ

0

बीड: Bajrang Sonawane-Ajit Pawar | बीड हा भाजपचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता. त्याचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते. पण या गडाला सुरुंग लावण्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांना यश आले. यावेळी तर सर्व समीकरणं जुळालेली असताना अचानक बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आणि विजयश्री खेचून आणला.

या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये जायन्ट किलर बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या निवकटवर्तीय असलेल्या सोनावणे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

त्यानंतर लगेचच सोनावणे यांना बीडची उमेदवारी मिळाली होती. आता लोकसभा निकाल लागून एक आठवडाही झाला नाही तोवर बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक्सवर खळबळजनक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचे म्हटले आहे.

आपल्या एका ओळीच्या पोस्टमध्ये मिटकरी म्हणाले, “बीडच्या

बप्पाचा दादांना फोन” आणि याबरोबर #मोठ्यामनाचादादा

असा हॅशटॅग वापरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.