NEET Exam | नीट परीक्षेच्या पावित्र्याला धोका; सुप्रीम कोर्टाने NTA ला बजावली नोटीस

0

पुणे: NEET Exam | वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची नीट ही प्रवेश परीक्षा असते. एकूण ७२० मार्कांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर द्यायचं असतं.

यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना ४ मार्क मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे १ मार्क कापला जातो. ४ जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच ६७ मुलांना पैकीच्या पैकी ७२० गुण मिळाले आहेत.

पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या ६७ टॉपर्सपैकी ६ जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती. देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने NTA ला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणी ८ जून रोजी होईल. तोपर्यंत NTA ने उत्तर दाखल करावे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.