ASI Pandurang Laxman Wanjle | पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग लक्ष्मण वांजळे यांना राष्ट्रपती पदक प्रदान

0

पुणे : पुणे पोलीस दलात (Pune Police) कार्यरत असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग वांजळे (ASI Pandurang Laxman Wanjle) यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक (President’s Police Medal) जाहीर झाले होते. वांजळे यांनी आजपर्यंत अनेक गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांना अटक केली आहे. राज्यात गाजलेल्या संदीप मोहोळ हत्या प्रकरणात पांडुरंग वांजळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपींना अटक केली होती. (ASI Pandurang Laxman Wanjle)

६ जून रोजी राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पोलीस पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor of Maharashtra Ramesh Bais) यांच्याहस्ते पांडुरंग वांजळे यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

पाडुरंग वांजळे यांची आजपर्य़तची कामगिरी

नुकत्यात उघडकीस आलेल्या आर्मी भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचा तपासात देखील वांजळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आर्मी भरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींचा दिल्ली येथे शोध घेऊन वांजळे (ASI Pandurang Laxman Wanjle) यांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पांडुरंग वांजळे हे सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकमध्ये कार्यरत आहेत.

2006 मध्ये झारखंडमधील ISI एजंट विशाल उपाध्यायला अटक करण्यात त्यांचा मोठा हात होता, विशालने पाकिस्तान मध्ये प्रशिक्षण घेतले होते. न्यायालयाने त्याला सहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. क्राइम ब्रँचमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 7 लाख 64 हजार रुपये किमतीची एकूण 42 पिस्टल आणि 75 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 2014 ते 2018 या कालावधीत त्यांची नियुक्ती सिंहगड पोलीस ठाण्यात झाली होती. वांजळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 15 खून, पाच आर्म अ‍ॅक्ट प्रकरणे, सात दरोडे, पाच चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, खंडणीची प्रकरणे, वाहन चोरीची प्रकरणे आणि NDPS चे एक प्रकरणांचा यशस्वीरित्या तपास करुन आरोपींना अटक केली आहे. तसेच पुणे शहरातील गँगवॉर प्रतिबंध करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी अनेक टोळ्यांमधील कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे.

पांडुरंग वांजळे यांनी आजपर्यंत 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात वांजळे यांना 270 पुरस्कार मिळाले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणारे गुणवत्तापूर्व सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पांडुरंग वांजळे यांनी आजपर्यंत मुख्यालय, समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station), गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, वारजे पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station), सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station), गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक -1 मध्ये काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.